Posts

Showing posts from October, 2023

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याकरिता दिनांक ०१ ते ०५ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १ ३ .० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३६ ते ५६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०५ ते ११ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था मागील काही दिवसांमधील किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी टेबूकोनॅझॉल २५.९ टक्के ईसी १० मिली किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच आद्रक पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. हळद कंद ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २८ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३३ ते ५७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०१ ते ०७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान हवामान कोरडे तर आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस बेणे प्रक्रिया व लागवड पुर्वहंगामी ऊसाची लागवड करण्यापुर्वी बेणे मॅलॅथीऑन ३०० मिली + बावीस्टीन १०० ग्रॅम बुरशीनाशके १०० लीटर पाण्याच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावे रासायनिक बेने प्रक्रिया झाल्यावर त्यानंतर ॲ सिटोबॅक्टर ५ किलो + स्फुरद विद्राव्य जिवाणू २ . ५ किलो + ट्राय कोडर्मा १ किलो प्रती १०० लीटर पाण्याचे द्रावण तयार करुन बेणे प्रक्रिया करावी व नंतर लागवड कराव...

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याकरिता दिनांक २४ ते २८ ऑक्टोबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजी नगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ६० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ ते ३१ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन काढणी अवस्था काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पीकाची काढणी करून योग्य वाळलेल्या पिकाची मळणी करुन घ्यावी. तसेच मळणीनंतर धान्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. आद्रक कंद वाढीची अवस्‍था मागील काही दिवसांमधील किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी टेबूकोनॅझॉल २...