छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १७ ते २१ ऑक्टोबर २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व अंशतःढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३६ ते ५६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ३ ते ६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ ते २७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला पिकांचेनाव ऊस कांडे अवस्था ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) १० ते १५ मिली किंवा ॲ सिफेट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . तसेच पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस बोंड धरणे ते वेचणी वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी. मागील काही द...