छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०१ ते ०५ जुन २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २३ ते ६६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २१ ते २४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०५ ते ११ जून २०२४ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस कांडे धरणे मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडा दिसून येत असुन याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापूस वाणांची निवड जमीन , कोरडवाहू किंवा बागायती ,...