Posts

Showing posts from March, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ मार्च २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २१ ते ५१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०७ ते १३ मार्च २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहून कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला पिकाचे नाव आद्रक साठवणुक आद्रक पिकाची काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी. हळद शिजवणी व वाळवणी हळद काढणीनंतर त्वरित सावलीत साठवणूक करावी. त्यानंतर ४ ते ५ दिवसांमध्येच हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून घ्यावी. कारण सर्व हळकुंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ तर लहान हळकुंडांना...