Posts

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २२ ते २६ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२  ते ७४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २६ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी  राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था नवीन लागवड केलेल्या ऊस फुटव्यांना मातीची भर द्यावी. जेणेकरुन फुटव्यांची वाढ जोमाने होवून रासायनिक खते मातीआड होतील. तसेच पिकातील तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल. कापूस बोंड धरणे ते वेचणी वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डो...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व ‍कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १०.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४६ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.     सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी किमान तापमानात घट होवून थंडी  वाढण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था आद्रक पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी व पिकास गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच अद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब  ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९.० ते १३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३८  ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी  राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन , याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५  मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कापूस बोंड धरणे ते वेचणी वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी बोंड...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १२ ते १६ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १६ ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था आद्रक पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी. तसेच अद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब  ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी. हळद कंद वाढीची अवस्था हळद पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी. तसेच हळद पीकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ ट...