छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ
राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९.० ते १३.०
अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३८ ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०७
किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२५
दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील
तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
कापूस
बोंड धरणे ते वेचणी
वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून
घ्यावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे
लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त प्रमाणास
दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा प्रोफेनोफॉस ४० टक्के +
सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ६ मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन आलटून पालटून फवारणी करावी.
तूर
फुलधारणा अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे तूर पीकामध्ये फुलगळ दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए) ४.५ टक्के एस.एल.४.४ मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा
इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
रोप अवस्था
वेळेवर पेरणी केलेल्या ज्वारी पिकामध्ये पहिली
कोळपणी करून घ्यावी.
मका
(रब्बी)
रोप अवस्था
वेळेवर पेरणी केलेल्या ज्वारी पिकामध्ये पहिली
कोळपणी करून घ्यावी.
करडई
रोप अवस्था
वेळेवर पेरणी केलेल्या करडई पिकामध्ये पहिली
कोळपणी करून घ्यावी.
गहू
बिजप्रक्रिया व पेरणी
गहू पिकाच्या पेरणीसाठी बियाण्याची मात्रा १००
ते १२० किलो प्रती हेक्टर घ्यावी आणि दोन ओळीतील अंतर २२.५ सेमी ठेवावे.
पेरणीपुर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम ३० ग्रॅम व द्रवरूप जैवीक खत १०० मिलि
प्रती १० किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करून पेरणी करावी.गहू पिकासाठी
१२०:६०:४० कि/हे.याप्रमाणे नत्र, स्फुरद
व पालाश शिफारशीत खतमात्रा आहे. यापैकी पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी तर स्फुरद व
पालाशची पूर्ण मात्र द्यावी.
कांदा
रोप अवस्था
कांदा पिकाची पुर्नलागवड बाकी असल्यास करून घ्यावी. तसेच कांदा पिकास
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
पेरू
फळ वाढीची अवस्था
पेरू बागेमध्ये फळकुज दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी किंवा झायनेब ७५ टक्के डब्ल्यूपी २०
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पेरू
फळबागेत फळांची जास्त संख्या असलेल्या फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन
फळांच्या वजनाने झाडांचे नुकसान होणार नाही.
आंबा
बहार धरणे
आंबा बागेत फुलधारणा
व्यवस्थित होण्यासाठी १३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
तापमानातील चढउतारामुळे सध्यस्थितीत टोमॅटो व
वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५
एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी..
तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट
सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत व नवीन
लागवड केलेल्या भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पाणी व्यवस्थापन
करावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत थंडी वाढण्यास सुरवात झाली असुन
थंडीपासुन बचाव करण्यासाठी जनावरे,शेळ्या तसेच कोंबडयाच्या गोठा/शेडला
बारदाण्याचे पडदे लावावेत. तसेच शेडमधील तापमान उष्ण ठेवण्यासाठी शेडमध्ये रात्री
१२ ते सकाळी ७ पर्यंत विदयुत बल्ब लावावेत. तसेच जनावरांच्या शरीरात उर्जा
निर्माण करण्यासाठी प्रथिनेयुक्त पौष्टीक चारा दयावा.
इतर
परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले
बायोमिक्स जैविक बुरशीनाशक व कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे
विक्रीस उपलब्ध आहे.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment