Posts

Showing posts from June, 2023

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०१ ते ०५ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून दि. ०१ जुलै २०२३ रोजी विखुरलेल्या स्वरुपात तर दि. ०२ ते ०५ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५९ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २१ ते २८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.      विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक ०५ ते ११ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था उशिरा लागवड केलेल्या ऊस पिकामध्ये मोठी बांधणी करून घ्यावी. तसेच पिक १०० ते १२० दिवसाचे झाले असल्यास पिकास जमिनीतून खत देणे टाळावे, याव्यतिरिक्त विद्राव्य खत ठिबक द्वारे द्यावे. कापूस पेरणीतील अंतर , बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया  कापूस पिक...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २८ जुन ते ०२ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २८ ते ३० जून २०२३ रोजी व्यापक तर दि. ०१ व ०२ जुलै २०२३ रोजी विखुरलेल्या स्वरुपात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २६ .० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० .० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७० ते ८८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २२ ते २७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०२ ते ०८ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन पेरणीतील अंतर , बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया  सोयाबीन पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी ६५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीत...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २४ ते २८ जुन २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामानसल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २४ ते २६ जून २०२३ रोजी तुरळक ठिकाणी तर दि. २७ व २८ रोजी २०२३ रोजी व्यापक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३१ ते ८३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.      सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. २४ जुन २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक २८ जुन ते ०४ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस कांडे धरणे  ऊस पिकास योग्य वेळेच्...