Posts

Showing posts from February, 2024

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०७ ते ११ फेब्रुवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४८ ते ९६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ११ ते १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहून आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.      कृषी हवामान सल्ला आद्रक काढणी अवस्था आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटरचा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते....

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०३ ते ०७ फेब्रुवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २३ ते ६५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १३ किमी/ता६ राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०७ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे व स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त व कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस लागवड / वाढीची अवस्था सुरु ऊस : सुरु ऊसाची लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत पूर्ण करावी. तसेच पूर्वहंगामी ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी १५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ०४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्‍बी ज्‍वारी दाणे भरणे अवस्‍था पक्ष्यांपासून...