Posts

Showing posts from January, 2025

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील . तसेच कमाल तापमान २८.८ ते ३२.१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.८ ते १९.८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १३ ते ४५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २२ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान हवामान कोरडे राहुन आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस वेचणी ते काढणी अवस्था शेतकरी बांध...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १९ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या आद्रक पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हळद परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हरभरा घाटे धरणे मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिलि  प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्य...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ११ ते १५ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १५ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. कापूस वेचणी ते काढणी अवस्था शेतकरी बांधवानी फरदड घेणे टाळावे. कापूस पिकाची शेवटची वेचणी झाल्याबरोबर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभी कपाशी कॉटन श्रेडरच्या साहाय्याने मूलस्थानी कुटी करावी त्यानंतर युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०८ ते १२ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४६ ते ८३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १२ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या आद्रक पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हळद परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हरभरा फुलधारणा / घाटे धरणे हरभरा पीकामध्ये घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्या...