छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ मार्च ते ०२ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते ढगाळ राहुन दि. ०१ व ०२ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठीकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०१ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०२ ते ०८ एप्रिल २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीऐवढे तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्...