छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ मार्च ते ०२ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते ढगाळ राहुन दि. ०१ व ०२ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठीकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०१ एप्रिल २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०२ ते ०८ एप्रिल २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीऐवढे तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच हंगामी ऊस पिकाची लागवड करून दीड महिन्‍याचा कालावधी झाला असल्‍यास १०० किलो नत्र प्रती हेक्‍टरी युरीयाव्‍दारे दयावे. तसेच ऊस पिकामध्ये खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी १० कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त दिसून येत असल्यास क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी १५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के  एससी ०४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

गहू   

काढणी अवस्‍था

दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी बाजरी

फुटवे अवस्था

बाजरी पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

कांदा/लसूण

काढणी अवस्‍था

दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. काढणी केलेले कांदा पीकाचे ढीग ताडपडीच्या सहाय्याने झाकून ठेवावेत. तसेच वाळलेल्या कांदा पीकाची सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.

आंबा

फळ वाढीची अवस्‍था

तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबा बागेमध्ये फळ गळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट  १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आंबा फळबागेतील झाडांच्या आळ्यामध्ये गवत, पालापाचोळा इत्यादी आच्छादनांचा वापर करून गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारामुळे भाजीपाला पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह पावसाची शक्यता असल्यामुळे सदर कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी जनावरे व पशुंना बाहेर चरावयास नेण्याचे टाळावे. तसेच संध्याकाळच्या वेळेस सुरक्षित गोठयामध्ये बांधून ठेवावे.

इतर

दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी वादळीवा-यासह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या पिकांची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच काढणी केलेल्या पीकांची सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी. जेणेकरुन पीकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला