Posts

Showing posts from April, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ एप्रिल २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ०३ व ०५ एप्रिल २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे . तसेच कमाल तापमान ३५.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २१ ते ८० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२  ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक ०१ ते ०३ एप्रिल २०२६ रोजी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग जास्त (५०-६० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०५ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरी पेक्षा जास्त तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला पिकांचेनाव   ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे पुढील दोन...