छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ एप्रिल २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहून दि. ०३ व ०५ एप्रिल २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३५.०
ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व
सापेक्ष आर्द्रता २१ ते ८० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक ०१ ते ०३ एप्रिल २०२६ रोजी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता
असून वाऱ्याचा वेग जास्त (५०-६० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०५ ते ११ एप्रिल २०२६
दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असून शेतकरी बांधवांनी
फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
गहू
काढणी अवस्था
गहू पिकाची काढणी झाली नसल्यास दोन दिवस पुढे ढकलावी.
काढणी केलेला गहू पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.
उन्हाळी बाजरी
फुटवे अवस्था
बाजरी पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास
पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
कांदा
काढणी अवस्था
पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असून शेतकरी बांधवांनी
कांदा पिकाची काढणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच काढणी केलेल्या कांदा पिकाची साठवणूक
सुरक्षित ठिकाणी करावी.
आंबा
फळ
वाढीची अवस्था
मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे गळून पडलेली आंबा फळे जमा करुन
बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. तसेच तुटलेल्या फांदया व्यवस्थित कट करुन बागेच्या
बाहेर टाकाव्यात.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पीकाची काढणी करुन घ्यावी. तसेच पुढील दोन दिवस
पावसाची शक्यता असल्यामुळे फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
पशुसंवर्धन
वातावरणातील अचानक बदलांमुळे कोंबडयांच्या पिल्लांवर
अतिरिक्त ताण निर्माण होवून आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची विशेष
काळजी घ्यावी. पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे व गरज भासल्यास पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने लसीकरण करुन घ्यावे.
इतर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक ०१ ते ०३ एप्रिल २०२६ रोजी वादळीवारासह तुरळक ठिकाणी गारपीट व हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता असून
वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बांधवानी काढणीस तयार असलेल्या
पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment