औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ३१ मे ते ०४ जुन २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ३१ मे २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे . तसेच कमाल तापमान ४२ .० ते ४३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ .० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३१ ते ८० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०४ ते १० जून २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन पूर्वमशागत सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे. खरीप ज्वारी पूर्वमशागत खरीप ज्वारी पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले...