औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ३० ऑगष्ट ते ०३ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ८४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०३ ते ०९ सप्टेंबर, २०२३ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन फुलोरा ते शेंगा धरणे अवस्था सद्यस्थितीत सोयाबीन पीकास पाण्याचा ताण बसत असुन त्याकरीता पोटॅशियम नायट्रेट(१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास पीकास तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ढगाळ व दमट वातावरणामुळे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्...