औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २६ ते ३० ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४९ ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते १९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दिनांक ३० ऑगष्ट ते ०५ सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ
राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी
ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्युजी १५०
ग्रॅम आणि डेल्टामेथ्रीन १०० इसी ११ टक्के २५० मिली प्रति एकर पाण्यात मिसळुन
आळवणी करावी.
कापूस
पाते लागणे ते फुलधारणा
अवस्था
मागील
आठवडयातील ढगाळ व दमट वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या
किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १०
पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकर प्रमाणात लावावेत. तसेच ५ टक्के निंबोळी
अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲसीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा फ्लोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी
प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस
पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.
मका
वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे लावावेत. तसेच मका
पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा
अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
तुर
फांद्या लागणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे तुर पीकावर पाने गुंडाळणा-या
अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफॉस २५ ईसी
२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मुग/उडीद
कळी ते फुलोरा अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मुग/उडीद पिकावर पाने खाना-या
अळींचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे सिताफळाच्या झाडांवरील फुले काळी पडून
गळून जात असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण
करणा-या (फुलकीडे, मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५
टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या
सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे,
जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची
स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त
काळजी घेणे गरजेचे आहे.
इतर
सद्यस्थितीत
जिल्हयात ब-याच ठिकाणी कमी पाऊस झाल्यामुळे पीकास पाण्याचा ताण बसत असुन त्याकरीता
पोटॅशियम नायट्रेट(१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. पीकास गरजेप्रमाणे उपलब्धतेनूसार संरक्षित
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
Comments
Post a Comment