छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०४ ते ०८ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ११ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान हवामान कोरडे तर आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

बेणे प्रक्रिया व लागवड

पुर्वहंगामी ऊसाची लागवड करण्यापुर्वी बेणे मॅलॅथीऑन ३०० मिली + बावीस्टीन १०० ग्रॅम बुरशीनाशके १०० लीटर पाण्याच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावे रासायनिक बेने प्रक्रिया झाल्यावर त्यानंतर सिटोबॅक्टर किलो + स्फुरद विद्राव्य जिवाणू . किलो + ट्रायकोडर्मा १ किलो प्रती १०० लीटर पाण्याचे द्रावण तयार करुन बेणे प्रक्रिया करावी व नंतर लागवड करावी.

कापुस

बोंड धरणे ते वेचणी अवस्था

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. तसेच कापुस पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त प्रमाणास दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आलटून पालटून फवारणी करावी.

तुर

कळी ते फुलधारणा अवस्था

तुर पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तुर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिक कळी अवस्‍थेत असताना हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावेत व ५ टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

बीजप्रक्रिया व पेरणी

बागायती ज्वारीच्या पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर बियाणे घ्यावे. तसेच पेरणीचे अंतर ४५ x १५ सेंमी ठेवावे व पेरणीपूर्वी ३०० मेस गंधक ०४  ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड  ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी त्यानंतर अझॅटोबॅक्टर + पीएसबी २५ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. उतार जमीनीत ज्वारी पीकाची पेरणी उतारास आडवी करावी. बागायतीसाठी ४०: ४०: ४० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश  खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी.

करडई

बीजप्रक्रिया व पेरणी

बागायती करडई पिकाची पेरणी १५ नोव्हेंबर पूर्वी करून घ्यावी.  पेरणीपूर्वी बियाण्‍यास थायरम ४ ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्‍डॅझिम २ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करावी. बागायतीसाठी ६०: ४०: ०० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. पेरणीच्या वेळी नायट्रोजनची अर्धी तर स्फुरदची पूर्ण मात्र द्यावी. करडई पिकामध्ये करडई + जवस ( ३:३ ) हरभरा + करडई, ज्वारी + करडई ( ४:२ ) हि अंतर पिके घेता येतात.

मका (रब्बी)

बिजप्रक्रिया व पेरणी

मका पिकाच्या पेरणीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ६० x ३० से.मी. ओळीतील अंतर ठेवुन पिकाची पेरणी करावी. पेरणी/लागवडपूर्वी सायएन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी यामुळे लष्करी अळीचे व्यवस्थापन होते व नंतर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास अ‍ॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी तसेच ट्रायकोडर्मा ५.० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे त्‍यानंतर बीयाणे सावलीमध्‍ये वाळवून पेरणी करावी.मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५  किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश दयावे.

गहू   

बिजप्रक्रिया व पेरणी

गहू पिकाच्या पेरणीसाठी लोक-१, फुले-समाधान, तपोवन, गोदावरी, एम ए सी एस ६२२२, एम ए सी एस ६४७४, त्रेंबक आणि पंचवटी या वाणांची निवड करावी. गहू पिकाच्या पेरणीसाठी बियाण्याची मात्रा १०० ते १२० किलो प्रती हेक्टर घ्यावी आणि दोन ओळीतील अंतर २२.५ सेमी ठेवावे. पेरणीपुर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम ३० ग्रॅम व द्रवरूप जैवीक खत १००  मिलि प्रती १० किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करून पेरणी करावी. गहू पिकासाठी १२०:६०:४० कि/हे. याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश शिफारशीत खतमात्रा आहे. यापैकी पेरणीच्या वेळी नायट्रोजनची अर्धी तर स्फुरद व पालाशची पूर्ण मात्र द्यावी.

कांदा

पुनर्लागवड

कांदा पिकाची पुनर्लागवड १० X १० सेंमी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम १० ग्रॅम व प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल १० मिलि. १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे व रोपाचे शेंडे कापून या द्रावणात बुडवून लागवड करावी. कांदा पिकासाठी १००:५०:५० कि/हे. याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश शिफारशीत खतमात्रा आहे. यापैकी पेरणीच्या वेळी नायट्रोजनची अर्धी तर स्फुरद व पालाशची पूर्ण मात्र द्यावी.

सिताफळ

फळ वाढीची आणि काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत. तसेच मिरची पीकावरील विषाणूजन्य चूरडामुरडा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रादूर्भावग्रस्त झाडे नष्ट करावीत. तसेच पायरीप्रोक्सीफेन १० टक्के ईसी २० मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच नवीन लागवड केलेल्‍या भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पाणी व्‍यवस्‍थापन करावे.

पशुसंवर्धन

शेळया व मेंढयांच्या पिल्लांना पशुवैदयकांच्या सल्ल्याने जंतनाशके दयावीत.

इतर

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या (सोयाबीन,खरीप ज्वारी,बाजरी) धान्याची चाळणी स्पायरल सेप्रेटर च्या साहाय्याने करून घ्यावी. जेणेकरुन कमी खर्चात धान्य स्वच्छ होण्यास मदत होईल.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला