Posts

Showing posts from May, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २७ ते ३१ मे २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्‍वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. २७ ते २९ मे २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५३ ते ७३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात २६ ते २८ मे २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३१ मे ते ०६ जून २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान , कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.                           ...