छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २० ते २४ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २६.० व ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २९ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. २४ ते ३० डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ
राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
कंद वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची
शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल
११.४ टक्के एससी १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद
कंद वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची
शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल
११.४ टक्के एससी १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा
वाढीची ते फांदया
धरणे
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे हरभरा पीकामध्ये रोप कुरतडणाऱ्या अळीच्या
प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के
ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक एक महिन्याचे
झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५०
पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. तसेच घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध
सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत.
जवस
वाढीची अवस्था
मागील आठवडयातील
ढगाळ वातावरणामुळे जवस पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या
व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती
१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बटाटा
वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे बटाटा पिकामध्ये लवकर येणारा करपा रोगाचा
प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी
२५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा प्रोपीनेब ७० टक्के
डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बटाटा
पीकामध्ये रस शोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे
प्रत्येकी २५ याप्रमाने प्रतिएकरी लावावेत.
मोसंबी
आंबिया बहार व्यवस्थापन
आंबिया
बहार : आंबिया
बहारासाठी झाडांना ५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ताण दयावा. फळ
काढणीनंतर वाळलेल्या फांदया तसेच बागेतील खाली पडलेली फळे जमा करुन नष्ट करावीत व
बाग स्वच्छ करावी आणि त्यानंतर १ टक्का कार्बेन्डाझीम या बुरशीनाशकाची फवारणी
घ्यावी.
डाळिंब
वाढीची अवस्था
आंबिया
बहार : डाळिंब
बागेमध्ये आंबिया बहाराच्या नियोजनासाठी जमिनीच्या प्रकारानुसार तीन ते सहा आठवडे
बागेस ताण द्यावा.
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळींब फळबागेमध्ये
साल पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त खोड किंवा
फांदीवरील छिद्रामध्ये क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मीली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने सोडावे व नंतर छिद्रे चिखलाने बंद करावीत.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे टोमॅटो पीकामध्ये करपा
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के
किंवा क्लोरोथॅलोनील ७५ टक्के २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. तसेच मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा ) किडीच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
रेशीम किटकांचे
थंडीपासुन संरक्षण करण्याकरीता संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा इलेक्ट्रीक शेगडीचा
वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान २२
ते २८ अंश से. व आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील याची काळजी घ्यावी. कच्या संगोपनगृहात
थंडी किंवा उष्णता मर्यादित ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट
कॉक्रेटच्या संगोपनगृह बांधकाम करुन घ्यावे. त्यामुळे रेशीम किटक रोगास बळी पडत
नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. सीएआर व टीआय, म्हैसूर
यांच्या शिफारशीनुसार संगोपनगृहाचा आकार असावा. खालच्या व वरील बाजूस झरोके व मधील
बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राहण्यास मदत होईल.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
तापमानात घट होत असल्याने शेतक-यांना जनावरांची अतिरिक्त उर्जेची गरज पुर्ण करण्याकरीता जनावरांच्या
आहारात जास्त उर्जा देणा-या तसेच खनिज मिश्रणांच्या खाद्याचा समावेश करावा.
इतर
सद्यस्थितीत
ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत असुन पशुपालकांनी जनावरांना ज्वारीची कोळळी धाटे
(पोंगे) खाण्यास देवू नये. जेणेकरुन पोंग्याव्दारे किराळ लागून होणा-या
विषबाधेपासून जनावरांचा बचाव होईल.
Comments
Post a Comment