छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून दि. ०१ व ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ०९.० ते १३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १९ ते ५४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहून आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक काढणी अवस्था आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटरचा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्टरचलित यंत्राद्वार...