छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २९ मार्च ते ०२ एप्रिल २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे, स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३७.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २० ते २८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३१ मार्च ते ०६ एप्रिल २०२४ दरम्यान हवामान कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस कांडे धरणे तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.तसेच हंगामी ऊस पिकाची लागवड करून दीड महिन्याचा कालावधी झाला असल्यास १०० किलो नत्र प्रती हेक्टरी युरीयाव्दारे दयावे. तसेच ऊस पिकामध्ये खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी १० कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त दिसून येत असल्यास क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईस...