छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २७ ते ३१ मार्च २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ५४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ११ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ३१ मार्च ते ०६ एप्रिल २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहून आकाश
स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी
तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता
आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
वाढीची अवस्था
उन्हाळी मका पिकातील आंतरमशागत
व तण व्यवस्थापन करून घ्यावे. तसेच पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास
७५ किलो नत्र प्रति हेक्टरी युरियाद्वारे द्यावे.
मोसंबी
फळवाढीची अवस्था
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत ओलावा टिकून
राहण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा या आच्छादनाचा वापर करावा.
डाळिंब
फळवाढीची अवस्था
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता डाळिंब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत ओलावा टिकून
राहण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा या आच्छादनाचा वापर करावा.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५
मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
रेशीम
किटक संगोपनगृहात तापमान व आर्द्रता उन्हाळयात लोखंडी पत्रयाऐवजी सिमेंट
पत्रांच्यावर गवत/कडबा या सारखे आच्छादन टाकून वरती स्प्रिंकलरची व्यवस्था करुन
पाणी खेळते ठेवता येते. बाजूला शेडनेटच्या बाहेरच्या बाजूस गोणपाट/चवाळयाच्या
सहाय्याने चोहीबाजूने आच्छादन करुन त्यास दोरीच्या सहाय्याने आवश्यक तेव्हा खाली वर
करायची व्यवस्था ठेवता येते व त्यावर ठीबक सिंचन १६ किंवा २० मीमी प्लॅस्टीक
टयूबमध्ये ०.५ एचपी मोटारच्या सहाय्याने पाणी सोडण्याची व्यवस्था केली तर संगोपन
गृहात आर्द्रता ८० ते ८५ टक्के व तापमान २५ ते २८ सें. ग्रे. ठेवणे शक्य होते व
उन्हाळयात कोषाची ३ पिके काढता येतील. मराठवाडा विभागात उन्हाळयात चांगला
सुर्यप्रकाश मिळत असल्याने पानाचे उत्पादन ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर चांगले
मिळते.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण
करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच कोंबडयांच्या शेडमधील
तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी
स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.
इतर
सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांना व फळबागेस सकाळ व सायंकाळच्या वेळेस संरक्षित
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर
सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.
Comments
Post a Comment