छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २४ ते २८ एप्रिल २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून दि. २५ ते २७ एप्रिल २०२४ दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १९ ते ४७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ एप्रिल ते ०४ मे २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला उन्हाळी मका वाढीची अवस्था मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिस...