Posts

Showing posts from December, 2024

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०१ ते ०५ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५६ ते ८९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०५ ते ११ जानेवारी २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या आद्रक पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हळद परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हरभरा फुलधारणा / घाटे धरणे हरभरा पीकामध्ये घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ७९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १ ते ५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस खोडवा व्यवस्थापन खोडवा व्यवस्थापन : शेतक-यांनी ऊस पाचट न जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा पध्दतीत पाचटाचे आच्छादन करावे किंवा कुटी यंत्राच्या साह्याने पाचटाचे कुटी करावी त्यानंतर पाचटावर पाचट कुजविणारे जिवाणू १० किलो + शेणखत + युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर मिसळून टाकावे व बगला फोडाव्यात. तसेच बुडखे जमीनीलगत छाटावे व छाटलेल्या ब...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १०.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २५ ते ५५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १ ते ४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २२ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्था सद्यस्थित आद्रक पिकातील कंदवाढ होण्यासाठी व जमीनीचे तापमान योग्य राखण्यासाठी पीकास संध्याकाळच्या वेळेस पाणी व्यवस्थापन करावे. हळद कंद वाढीची अवस्था सद्यस्थित हळद पिकातील कंदवाढ होण्यासाठी व जमीनीचे तापमान योग्य राखण्यासाठी पीकास संध्याकाळच्या वेळेस पाणी व्यवस्थापन करावे. हरभरा फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था हरभरा पीकामध्ये घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमि...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १४ ते १८ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १८ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे पूर्वहंगामी ऊसास लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.    कापूस वेचणी वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा चांगला व कवडी कापूस वेगळा साठवावा . तूर शेंगा धरणे ते दाणे भरणे अवस्था तापमानातील चढउतारामुळे तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्...