Posts

Showing posts from May, 2025

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३१ मे ते ०४ जुन २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० जुन २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान,कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  कृषि हवामान सल्ला कापूस पुर्वमशागत/ वाणांची निवड कोरडवाहू कापूस लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत. तसेच जमिनीचा प्रकार , कोरडवाहू किंवा बागायती , लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यानुसार कापुस पिकाच्या लागवडीकरिता आपल्या भागात उत्पनास सरस असलेल्या वा णां ची निवड करावी. म का पुर्वमशागत/ वाणांची निवड मका पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ मे ते ०१ जून २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३६ ते ७९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कतेचा ईशारा  : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक २७ ते २९ मे २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०१ ते ०७ जुन २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता असुन पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन वाणांची निवड सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी एमएयुएस-१५८ , एमएयुएस-१६२ , एमएयुएस-६१२ , एमएयुएस-...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २४ ते २८ मे २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०१ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २३ ते २६ मे २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. २७ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४०-५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ मे ते ०३ जुन २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  कृषि हवामान सल्ला कापूस जमिनीची निवड /पुर्वमशागत कापूस पिकाच्या लागवडीकरिता मध्यम ते भार ी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्य...