छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३१ मे ते ०४ जुन २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० जुन २०२५ दरम्यान
हवामान अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान,कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
कापूस
पुर्वमशागत/ वाणांची निवड
कोरडवाहू कापूस लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत.
तसेच जमिनीचा प्रकार, कोरडवाहू किंवा
बागायती,लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यानुसार कापुस पिकाच्या लागवडीकरिता
आपल्या भागात उत्पनास सरस असलेल्या वाणांची निवड करावी.
मका
पुर्वमशागत/ वाणांची निवड
मका पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत. तसेच मका पिकाच्या लागवडीसाठी नवज्योत, मांजरा,डीएमएच-१०७, के एच-९४५१, एमएचएच, प्रभात, करवीर, डेक्कन-१०३ पिनॅकल इत्यादी या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.
तूर
पुर्वमशागत/ वाणांची निवड
तूर पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत.
तसेच तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-७११,बीडीएन
२०१३-४१(गोदावरी), बीडीएन-७०८, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७१६ या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.
मूग/उडीद
पुर्वमशागत/ वाणांची निवड
मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी
पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत. मूग
लागवडीसाठी बीएम -४, कोपरगांव, बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, फुलेमुग-२, पीकेव्हीकेएम-४ या वाणांची तर उडीद लागवडीसाठी बिडीयु -१, टीएयु -१, टीपीयु
-४ या वाणांची निवड करावी.
सिताफळ
लागवडीपूर्व नियोजन
सिताफळाच्या
नवीन लागवडीसाठी ४५ x ४५ x ४५
सेमी आकाराचे खड्डे घेऊन त्यात दिड ते दोन घमेले शेणखत किंवा चांगले कुजलेले
कंपोस्ट खत अर्धा किलो सुपर फॉस्फेट व फोलिडोल पावडर व चांगल्या मातीच्या
मिश्रणाने ते खडे भरावे.
आंबा
लागवड पूर्व नियोजन
नवीन आंबा रोपे लागवडीसाठी १ x १ x १ आकाराचे
खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत व पोयटा
माती या सर्व मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.
भाजीपाला
रोपे तयार करणे
खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटीकेत
गादी वाफयावर बियाण्याची लागवड करून रोपे तयार करावीत.
पशुसंवर्धन
शेतकरी बांधवांनी जनावरांना जंतांच्या व विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.
इतर
सध्यस्थितीत
काही ठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असून मान्सूनचा पाऊस येण्यास अवकाश
आहे, तरी शेतकरी बांधवानी
आपल्या भागात पेरणीयोग्य हंगामी पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच
जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
तसेच शेतकरी बांधवानी निविष्ठा (बियाणे, खते, कीड व
कीटकनाशके) खरेदी करत असताना पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज
परिक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे
प्रमाण, निवळ वजन, विक्रेत्याचे नाव व पत्ता
तसेच पक्के बिल/ पावती घ्यावी तसेच बिलावर खरेदी केलेल्या तारखेचा उल्लेख असावा.
Comments
Post a Comment