छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २४ ते २८ मे २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०१ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २३ ते २६ मे २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. २७ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४०-५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ मे ते ०३ जुन २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

कापूस

जमिनीची निवड /पुर्वमशागत

कापूस पिकाच्या लागवडीकरिता मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिन निवडावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीची निवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली ६० ते १०० सेमी असावी व सामू ०६ ते ८.५ असावा. कोरडवाहू कापूस लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत.

का

जमिनीची निवड /पुर्वमशागत

मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल उत्तम पाण्याचा निचरा करणारी जमीन हमखास असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ इतका असावा. मका पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत.

तूर

जमिनीची निवड /पुर्वमशागत

तूर पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. तूर पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत.

मूग/उडीद

जमिनीची निवड /पुर्वमशागत

मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. एकदम हलक्या प्रतीच्या मुरमाड जमिनीत पीक घेऊ नये.पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. मूग /उडीद पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे वापसा येताच पूर्ण करावीत.

सिताफळ

जमिनीची निवड

नवीन सीताफळ रोपांची लागवड कमी पावसाच्या, मुरमाड, अंत्यत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनी, मध्यम खोल जमिनीत करता येते.

आंबा

परिपक्वता ते काढणी/ जमिनीची निवड

पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज लक्षात घेता जिल्हयामध्ये वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेककरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते.

जमिनीची निवड : सर्वसाधारणपणे पाण्याचा निचरा होणारी, १.५ ते २ मीटर खोलीची आणि त्याखाली मुरुम असलेली जमीन ह्या पिकासाठी निवडावी. लागवडीसाठी ५.५ ते ७.५ सामू असणारी जमीन अनुकूल आहे.

भाजीपाला

जमिनीची निवड / पुर्वमशागत

पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज लक्षात घेता जिल्हयामध्ये वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पीकाची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच मागील काही दिवसामधील झालेल्या पावसामुळे खराब व गळून पडलेली फळे वेचून नष्ट करावीत.

खरीप हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे वापसा येताच करावीत. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकाच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करावी.

पशुसंवर्धन

------

पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज लक्षात घेता जिल्हयामध्ये वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी जनावरांना बाहेर उघडयावर न बांधता सुरक्षित ठिकाणी किंवा गोठयातच बांधावे. शेतकरी बांधवांनी जनावरांना जंतांच्या विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.

इतर

------

शेतकरी बांधवानी निविष्ठा (बियाणे, खते, कीड व कीटकनाशके) खरेदी करत असताना पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परिक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निवळ वजन, विक्रेत्याचे नाव व पत्ता तसेच पक्के बिल/ पावती घ्यावी तसेच बिलावर खरेदी केलेल्या तारखेचा उल्लेख असावा.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला