छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ जुन ते ०२ जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८० ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २७ जून २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०२ ते ०८ जुलै २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस पुर्वमशागत व वाणांची निवड आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्ही...