छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३० जुलै ते ०३ ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७४ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०३ ते ०९ ऑगष्ट २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन वाढीचे ते फांद्या लागणे अवस्था मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी ५-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ ...