छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २३ ते २७ जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ८९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २२ व २६ जुलै
२०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते
मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास)
राहील.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २७ जुलै ते ०२ ऑगष्ट २०२५ दरम्यान
हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधीक तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी
तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाढीचे ते फांद्या लागणे अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा
प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५
मिलि किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी
५-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे पावसाची उघाड बघुन करावी.
खरीप ज्वारी
वाढीची अवस्था
ज्वारी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत.
तसेच मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन, प्रादुर्भाव ओळखण्यासाठी पिकात १५ कामगंध सापळे
प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
बाजरी
वाढीची अवस्था
बाजरी पिकामध्ये कोळपणी
व तणनियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करून घ्यावीत. तसेच बाजरी पीकास पेरणीनंतर ३० दिवस
झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हलक्या जमिनीत २० किलो तर भारी जमिनीत ३० किलो
प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.
खरिप भुईमुग
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ हवामान असल्यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच खरीप भुईमूग पिकामध्ये कोळपणी व
तणनियंत्रणाचे कामे पावसाची उघाड बघून करुन घ्यावीत.
आद्रक
वाढीची अवस्था
आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. तसेच आद्रक
पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा (कंदसड) प्रादुर्भाव टाळण्यासाठी परभणी कृषि
विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर
प्रति एकर प्रमाण २०० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे हळद पिकावर पाने खाणाऱ्या अळीचे
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही)
२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य
रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅनो युरिया
४० मिली व कार्बेन्डाझिम १२ टक्के + मॅंकोझेब ६३ टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण
करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली
किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे भेंडी पिकामध्ये भुरी रोगाच्या
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारे सल्फर २५ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच भाजीपाला
पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे
प्रत्येकी २५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
तुती रेशीम
सध्यस्थितीत रेशीम शेतकऱ्यांनी, तुती
पाने खादय पातळ एका थरात दयावे. जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन
वेळा दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामळे
बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते वेळी अर्धा तास
अगोदर विजेता निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति किल्लो
मिसळून रॅकवर धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ घालण्या अगोदर अर्धा ते
एक तास पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना खादय दयावे.
पशुसंवर्धन
पावसाळ्यामध्ये अस्वच्छता व वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने या
वातावरणात विविध जिवाणू व विषाणूंची वाढ झपाट्याने होऊन जनावरे जिवाणुजन्य व
विषाणुजन्य रोगास बळी पडतात हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठयात व गोठ्याच्या
बाहेरील भागात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
इतर
सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या
शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक
बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान
केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत.
Comments
Post a Comment