Posts

Showing posts from October, 2025

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २९ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २ ८ व २९ ऑक्टोंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा , विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०२ ते ०८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता आद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २५ ते २९ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५३ ते ८९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २४ व २५ ऑक्टोंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा , विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २९ ऑक्टोंबर ते ०४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे  राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला ऊस जमीनीची निवड व वाणाची निवड पुर्वहंगामी ऊसाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडाव...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २१ ते २५ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ ते ढगाळ राहील . तसेच कमाल तापमान ३० .० ते ३२ .० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३९ ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ० ५ ते ० ८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २५ ते ३१ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन काढणी अवस्था काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पीकाची काढणी करून योग्य वाळलेल्या पिकाची मळणी करुन घ्यावी. तसेच मळणीनंतर धान्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी. बाजरी काढणी अवस्था बाजरी पीकाची काढणी व मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धांन्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ राहून दि. १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी अतीशय तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २२ ते २८ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे  राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला ऊस जमीनीची निवड व वाणाची निवड पुर्वहंगामी ऊसाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. ऊस लागवडीसाठी शेत तयार करतांना  हेक्टरी ५० गाडया शेणखताच्या टाकुन रिजरने उतारास आडव्या स-या काढाव्यात. पुर्वहंगामी ऊसाच्या लागवडीसाठी ऊस लागवडी साठी को-८६०३२, को-२६५, को- ८००५, को-१०००१ आणि को-...