छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १८ ते २२ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ राहून दि. १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी अतीशय तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २२ ते २८ ऑक्टोंबर २०२५
दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान
तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता
आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
जमीनीची निवड व वाणाची निवड
पुर्वहंगामी ऊसाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी व
पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. ऊस लागवडीसाठी शेत तयार करतांना हेक्टरी ५० गाडया शेणखताच्या टाकुन रिजरने
उतारास आडव्या स-या काढाव्यात. पुर्वहंगामी ऊसाच्या लागवडीसाठी ऊस लागवडी साठी को-८६०३२, को-२६५, को- ८००५, को-१०००१ आणि को-३१०२ यासारख्या अधिक
उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची
निवड करावी.
कापूस
बोंड धरणे ते वेचणी
वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून
घ्यावी. मागील काही दिवसातील ढगाळ
वातावरण व तापमानातील चढ उतारामुळे कापुस पिकाची पाने लालसर दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी डीएपी २०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम किंवा पोटॅशिअम
नायट्रेट १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तूर
फांद्या धरणे ते फुलधारणा
अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व पावसामुळे तुर
पीकाच्या खोडावर काळे डाग व खाचा पडुन झाड हळूहळू वाळायला लागते हा फायटोप्थोरा
रोग असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील एम ४ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २५ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच तुर पिकामध्ये
अंतरमशागतीचे कामे करून घ्यावीत.
रब्बी ज्वारी
बीजप्रक्रिया ते पेरणी
रब्बी ज्वारी पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर
बियाणे घ्यावे.तसेच पेरणीचे अंतर ४५ x
१५ सेंमी
ठेवावे व पेरणीपूर्वी ३०० मेस गंधक ०४
ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज
प्रक्रिया करावी त्यानंतर अझॅटोबॅक्टर + पीएसबी २५ मिलि प्रती किलो बियाणे
याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. ज्वारी पिकाची पेरणी वाफसा येताच करुन घ्यावी.
उतार जमीनीत ज्वारी पीकाची पेरणी उतारास आडवी करावी. कोरडवाहूसाठी ४०: २०: २०
याप्रमाणे नत्र स्फुरद व पालाश
संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. तर बागायतीसाठी ४०: ४०: ४० याप्रमाणे
नत्र स्फुरद व पालाश खतमात्रा
पेरणीच्या वेळेस दयावी. कोरडवाहू ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तर
बागायती ज्वारीच्या पेरणी ३१ ऑक्टोंबर पर्यंत करता येते.
मका (रब्बी)
बिजप्रक्रिया व पेरणी
मका पिकाच्या पेरणीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे
वापरावे व ६० x
३० से.मी.
ओळीतील अंतर ठेवुन पिकाची पेरणी करावी. पेरणी/लागवडपूर्वी सायएन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली
प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया
करावी यामुळे लष्करी अळीचे व्यवस्थापन होते व नंतर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि
पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी तसेच ट्रायकोडर्मा ५.० ग्रॅम
प्रति किलो बियाण्यास लावावे त्यानंतर बीयाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी.मका
पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश
दयावे.
करडई
बीजप्रक्रिया ते पेरणी
करडई पिकाच्या पेरणीसाठी १२-१५ किलो प्रती हेक्टर
बियाणे वापरावे व ४५ x २० किंवा ३० x १०
जमीनिच्या प्रकारानुसार ओळीतील अंतर ठेवुन जमिनीत वाफसा येताच करडई पिकाची पेरणी
करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ४ ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्डॅझिम २ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रीया करावी त्यानंतर अँझोटोबॅक्टर
अथवा ॲझोस्पीरीलम + पीएसबी २० ते २५ मिलि प्रती किलो
बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
कोरडवाहूसाठी २०: २०: ०० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा
पेरणीच्या वेळेस दयावी.
कांदा
रोपवाटीका तयार करणे
कांदयाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे १ मी रुंद, ३ मी लांब आणि १५ सेमी उंच तयार
करावा. वाफयाच्या रुंदीशी समांतर अशा ५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यामध्ये
बियाणे ओळीत पातळ पेरुन नंतर मातीने झाकुन टाकावे. कांदा लागवडीसाठी ॲग्रीफाउंड डार्क रेड, ॲग्रीफाउंड लाईट रेड, भिमा
रेड, भिमा किरण (लाल कांदा) आणि भिमा स्वेत, भिमा सफेद (पांढरा कांदा) या वाणांचा
वापर करावा.
पेरू
फळ वाढीची अवस्था
पेरु बागेतील फळमाशीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी
मिथाईल युजेनॉलचे सापळे लावावेत. तसेच पेरू फळबागेत फळांची जास्त संख्या असलेल्या
फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन फळांच्या वजनाने झाडांचे नुकसान होणार
नाही.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे
चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत. तसेच नवीन लागवड
केलेल्या भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
पशुपालकांनी जनावरांचे रोगबाधा टाळण्याकरीता नियमित
रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन जनावरांमध्ये रोगप्रतिकारक
शक्ती तयार होवून जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.
इतर
परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स जैविक
बुरशीनाशक व कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबाद येथे विक्रीस उपलब्ध
आहे.

Comments
Post a Comment