Posts

Showing posts from December, 2025

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ०४ जानेवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४२ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०१ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०४ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.   कृषी हवामान सल्ला पिकाचे नाव आद्रक कंद वाढीची अवस्था आद्रक पिकाचे उघडे पडलेले कंद मातीने झाकुन घ्यावेत. तसेच आद्रक पीकावर ठिपके/ करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवथथापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टिकरसह १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आद्रक पीकात आवश्यकतेनुसार पा...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २७ ते ३१ डिसेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ७० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३१ डिसेंबर २०२५ ते ०६ जानेवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.   कृषि हवामान सल्ला पिकांचे नाव ऊस खोडवा व्यवस्थापन खोडवा व्यवस्थापन : शेतक-यांनी ऊस पाचट न जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा पध्दतीत पाचटाचे आच्छादन करावे किंवा कुटी यंत्राच्या साह्याने पाचटाचे कुटी करावी त्यानंतर पाचटावर पाचट कुजविणारे जिवाणू १० किलो + शेणखत + युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर मिसळून टाकावे व ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहून दि. १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८.० ते १०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३५ ते ५१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी किमान तापमानात घट होवून तुरळक ठिकाणी शितलहरीची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ४१ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.   कृषी हवामान सल्ला पिकाचे नाव आद्रक कंद वाढीची अवस्था आद्रक पिकामध्ये कंदमाशीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उघडे पडलेले कंद मातीने झाकुन घ्यावेत. तसेच आद्रक पीकावर ठिपके/ करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व...