छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला


 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहून दि. १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८.० ते १०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३५ ते ५१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   

सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी किमान तापमानात घट होवून तुरळक ठिकाणी शितलहरीची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ४१ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

आद्रक

कंद वाढीची अवस्था

आद्रक पिकामध्ये कंदमाशीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उघडे पडलेले कंद मातीने झाकुन घ्यावेत. तसेच आद्रक पीकावर ठिपके/ करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवथथापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टिकरसह १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आद्रक पीकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

हळद

कंद वाढीची अवस्था

हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उघडे पडलेले कंद मातीने झाकुन घ्यावेत. तसेच हळद पीकावर ठिपके/ करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवथथापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टिकरसह १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पीकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

हरभरा

वाढीची अवस्था

सद्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे हरभरा पीकामध्ये मर रोगाचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४० मिली/ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी किंवा पिकास आळवणी करावी. तसेच घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. हरभरा पीकास गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

जवस

वाढीची अवस्था

जवस पीकास गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

बटाटा

वाढीची अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे बटाटा पीकामध्ये लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा प्रोपीनेब ७० टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बटाटा पीकामध्ये रस शोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ याप्रमाने प्रति एकरी लावावेत.

मोसंबी

आंबिया बहार व्यवस्थापन

 

आंबिया बहार : आंबिया बहारासाठी झाडांना ५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ताण दयावा. तसेच वाळलेल्या फांदया, बागेतील खाली पडलेली फळे जमा करुन नष्ट करावीत व बाग स्वच्छ करावी आणि त्यानंतर १ टक्का कार्बेन्डाझीम या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

डाळिंब

वाढीची अवस्था

डाळींब फळबागेमध्ये साल पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त खोड किंवा फांदीवरील छिद्रामध्ये क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने सोडावे व नंतर छिद्रे चिखलाने बंद करावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे भाजीपाला पीकामध्ये भुरी रोगाचा प्रादर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझाक्सीस्ट्रॉबीन २३ टक्के एससी १० मीली  किंवा कॅप्टन ५० टक्के डब्ल्यू पी २०.५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सद्यस्थितीत तापामानात घट होत असल्यामुळे भाजीपाला पीकामध्ये गरजेनुसार मोकाट पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम

सद्यस्थितीमध्ये  थंडीत वाढ होत असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ होते.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत थंडी मध्ये वाढ होत असुन शेळया, मेंढया, कोंबडया तसेच पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्याकरीता पशुधनास रात्रीच्या वेळी मोकळया जागेत न बांधता गोठयात किंवा शेडमध्ये बांधावे, गोठयास व शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत. तसेच कोंबडयांच्या शेडमध्ये इलेक्ट्रीक बल्ब लावावेत.

इतर

रब्बी हंगामातील पीकांना गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच फळबागेतील तापमान नियंत्रित ठेवण्याकरीता रात्रीच्या व सकाळच्या वेळी धुर करावा.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला