छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २९ एप्रिल ते ०३ मे २०२३ साठी हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २९ ते ६४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ एप्रिल २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३ ते ९ मे २०२३ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस कांडे धरणे सुरु ऊस पीकाची लागवड करुन ३ ते ४ महिने झालेले असल्यास...