छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २९ एप्रिल ते ०३ मे २०२३ साठी हवामान अंदाज

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २९ ते ६४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ एप्रिल २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३ ते ९ मे २०२३ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

सुरु ऊस पीकाची लागवड करुन ३ ते ४ महिने झालेले असल्यास प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र युरीयाव्दारे द्यावे. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

उन्हाळी बाजरी

कणसे धरणे अवस्था

बाजरी पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

आंबा

फळ वाढीची ते परिपक्वता अवस्‍था

मागील आठवडयातील वादळीवारा व पावसामुळे गळून पडलेल्या आंब्याच्या कै-या वेचून तसेच काढणीस तयार असलेले आंबा फळे काढणी करुन घ्यावीत व प्रतवारी करुन बाजारात ‍विक्रीस पाठवावीत. मागील आठवड्यातील तापमानातील चढउतार व ढगाळ वातावरणामुळे आंबा फळावर काळे डाग दिसून येत असून याच्या व्यवस्थापानासाठी कार्बेन्डाझिम १० टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के डब्ल्यू पी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.  

भाजीपाला

फुले ते फळधारणा अवस्था

मागील आठवडयातील वादळीवारा व पावसामुळे गळून पडलेले टोमॅटो जमा करुन नष्ट करावीत. वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल. फळधारणा झालेल्या टोमॅटो पिकामध्ये काठी व दोरीच्या सहाय्याने आधार दयावा.

चारा पिके

चारा पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच काढणीस तयार असलेला हिरवा चारा कापणी करुन जनावरांना दुपारच्या वेळेस खाण्यास द्यावा.

पशुसंवर्धन

तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असुन सर्व शेतकरी बांधवानी पाऊस चालू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडू नये व जनावरांना बाहेर न बांधता गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच वादळीवारा व विजेचा कडकडाट चालू असताना जनावरे झाडाखाली बांधणे टाळावे.

इतर

शेतक-यांनी मागील दोन वर्षी नांगरणी केली नसल्यास खोल नांगरणी करुन घ्यावी. जेणेकरुन नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून जमीनीतील किड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल. तसेच नांगरणी केलेल्या शेतामध्ये रोटाव्हेटरचा वापर करणे टाळावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला