Posts

Showing posts from July, 2023

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २९ जुलै ते ०२ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून  दि. २९ जुलै २०२३ रोजी व्यापक प्रमाणात मध्यम स्वरुपाचा तर दि. ३० जुलै ते ०२ ऑगष्ट २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २५ ते २९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक ०२ ते ०८ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस बेणेप्रक्रिया व लागवड आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डाय...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २६ ते ३० जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २६ व २७ जुलै २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात तर दि. २८ ते ३० जुलै २०२३ तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ .० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २४ ते २९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. २५ व २६ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ३० जुलै ते ०५ ऑगष्ट २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन वाढीची अवस्था सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण नि...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २२ ते २६ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून   दि. २२ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी जोरदार तर दि. २३ ते २६ जुलै २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.     सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. २२ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक २६ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस बेणेप्रक्रिया व लागवड आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोए...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून व्यापक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० .० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. १८ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची तर दि. १९ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. २३ ते २९ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन रोप ते वाढीची अवस्था सोयाबीन पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी. तसेच पिकामध...