औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २९ जुलै ते ०२ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २९ जुलै २०२३ रोजी व्यापक
प्रमाणात मध्यम स्वरुपाचा तर दि. ३० जुलै ते ०२ ऑगष्ट २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक
प्रमाणात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३०.०
अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ६४ ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २५ ते २९ किमी/तास राहण्याची
शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दिनांक ०२ ते ०८ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच
पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
बेणेप्रक्रिया व लागवड
आडसाली ऊस
लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली
ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची
निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३००
मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५ मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक
प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो + स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १
किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२०
मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.
कापूस
रोप ते वाढीची अवस्था
मागील
आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकामध्ये मुळ कुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव
दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २०
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पिकामध्ये
कोळपणी व तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघून करावीत. तसेच कापुस पिकामध्ये
लागवडीच्या वेळी खताची पहिली मात्रा दिली नसल्यास, ६०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व
पालाश प्रति हेक्टर आळे पद्धतीने किंवा पेरून द्यावा.
मका
रोप ते वाढीची अवस्था
मका पिकामध्ये
स्फुरद या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची पाने जांभळी पडत असून याच्या
व्यवस्थापनासाठी १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ या विद्राव्य खताची १०० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुर
रोप ते वाढीची अवस्था
तुर पिकामध्ये कोळपणी व तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत.
मूग/उडीद
रोप ते वाढीची अवस्था
मूग/उडीद पिकामध्ये कोळपणी व तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत.
सिताफळ
फुल ते फळ धारणा अवस्था
सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी बागेतील
सर्व झाडाच्या जमिनीलगत बुडावर चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण (ग्रीस) पसरवावे.
भाजीपाला
फुलधारणा
ते फळधारणा
टोमॅटो
पिकावर शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी जर प्रादुर्भाव जास्त
असल्यास सायपरमेथ्रीन १० टक्के ई.सी.०६ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी.
१० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस सी ०३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
चारा पिके
वाढीची
अवस्था
सध्यस्थितीत
पशुधनास दैनंदिन आहारामध्ये हिरव्या व वाळलेल्या चा-याचे प्रमाण २:१ ठेवावे. हिरवे
गवत कापताना साधारण ६ इंच खोडव्यापासून अंतर ठेऊन कापावे. चारा
पिकामध्ये आंतरमशागतीची कामे शेतामध्ये वापसा असल्यास करून घ्यावीत.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा जेणेकरून बाहेरून येणाऱ्या
रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच शेळ्या व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे
माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी
शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.
इतर
शेतकरी बांधवांनी पिकातील
आंतरमशागतीची कामे करुन घ्यावीत. जेणेकरुन पीकांच्या मुळाभोवती जमीन भुसभुसीत
होवून हवा खेळती राहील व पीकाची वाढ जोमाने होण्यास मदत होईल.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.
Comments
Post a Comment