औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०६ ते १० सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून  दि. ०६ व १० सप्टेंबर २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक स्वरुपात हलक्या तर दि. ०७ ते ०९ सप्टेंबर २०२३ व्यापक स्वरुपातुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४८ ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २१ ते २६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह दि. ०६ सप्टेंबर २०२रोजी हलक्या तर दि. ०७०८ सप्टेंबर २०२ रोजी मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. १० ते १६ सप्टेंबर, २०२३ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

शेंगा धरणे ते दाणे भरणे अवस्था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे सध्यस्थितीत सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिली किंवा फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

खरीप ज्वारी

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये मिजमाशीचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन मॅलाथिऑन किटकनाशकाची ५ टक्के भुकटी २० किलो याप्रमाणे प्रति हेक्टरी धुरळणी करावी.

खरीप भुईमूग 

शेंगा धरणे अवस्था

सद्यस्थितीत वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुईमुग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल ५ टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच भुईमुग पीकावरुन रिकामे ड्रम फिरवावे, त्यामुळे आ-या जमीनीत घूसून शेंगांची संख्या वाढण्यास मदत होईल.

आद्रक

कंद धरणे अवस्‍था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी टेबूकोनॅझॉल २५.९ टक्के ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हळद

कंद धरणे अवस्‍था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये फळगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेनडेझीम २० ग्रॅम + युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड (GA) २ ग्रॅम + पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.  

डाळिंब

फळ वाढ ते काढणी अवस्‍था

डाळिंब बागेमध्ये फायटोप्थोरा बुरशीमुळे मर दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झिल ८ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड ( ५०टक्के डब्लूपी) किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच दमट वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा इत्यादी) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत.  

तुती रेशीम

रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.  

पशुसंवर्धन

पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहता शेतकरी बांधवांनी आपले पशुधन झाडाखाली, पाणवठयाजवळ किंवा लोखंडी अवजारांना न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत. तसेच जोरदार पावसाच्या अनुषंगाने गोठयांची डागडूजी करुन घ्यावी. पाऊस चालू असतांना जनावरांना बाहेर चरावयास सोडू नये.

तसेच सद्यस्थितीत गोवंशीय पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे, जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

इतर

आपल्या भागातील विजेचे ठिकाण जाणून घेण्यासाठी शेतक-यांनी दामिनी तर आपल्या भागातील हवामान व शेतीविषयक कृषिसल्ल्यांकरीता मेघदूत हे शासनाचे अधिकृत ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करुन त्याचा वापर करावा. जेणेकरुन होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

  1. नमस्ते सर, सोयगाव तालुक्यात प्रामुख्याने कापूस पीक घेतले जाते नेमकं या हवामानाचा कापूस पिकाचा समावेश नसतो तरी पुढील सल्ला मध्ये कापूस पिकाची समावेश होईल अशी आशा प्राप्त

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला