छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३१ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६३ ते ८८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३० ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. ०३ सप्टेंबर २०२४ रोजी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ५० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०४ ते १० सप्टेंबर २०२४ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्...