छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३१ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६३ ते ८८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३० ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. ०३ सप्टेंबर २०२४ रोजी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ५० किमी/तास) राहील.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०४ ते १० सप्टेंबर २०२४ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

वाढीची अवस्था

ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्युजी १५० ग्रॅम आणि डेल्टामेथ्रीन १०० इसी ११ टक्के २५० मिली प्रति एकर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

कापूस

पाते लागणे ते बोंड धरणे

मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा फ्लोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवण्याकरीता प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत व कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.

का

कणसे धरणे

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून  व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी किंवा सध्यस्थितीत मका पिकाची वाढ झालेली असल्यामुळे मका पीकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने ‍किडव्यवस्थापन करण्याकरीता मेटारायझियम ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

तूर

फांद्या लागणे अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे तुर पीकावर पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

मूग/उडीद

शेंगा वाढीची ते परिपक्वता अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मुग/उडीद पिकावर पाने खाणारी व शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फ्ल्यूबेंडामाईड ३९.३५ टक्के एससी २ मिली किंवा क्लोरँन्ट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के ईसी ३ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.

सिताफळ

फळ वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास बागेत झाडांच्या बुध्यां भोतवतालच्या तणांचे व्यवस्थापन करावे तसेच व्हर्टिसिलियम लिकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील आढवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोले १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.  

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत सूक्ष्म जंतू व परोपजीवींच्या वाढीमुळे जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनास रोगप्रतिकारक लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्लयाने करुन घ्यावे. तसेच जनावरांना वास असलेला, बुरशीयुक्त चारा खाण्यास देऊ नये.

इतर

पुढील दोन दिवस जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून शेतकरी बांधवांनी शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला