छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३० ऑक्टो.ते ०३ नोव्हें.२०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ७० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०१ ते ०४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ते ०९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्था मागील आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. हळद कंद वाढीची अवस्था मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा (...