छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३० ऑक्टो.ते ०३ नोव्हें.२०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ७० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०१ ते ०४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ते ०९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
कंद वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के
डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
हळद
कंद वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के
डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
हरभरा
पेरणी
पाण्याची
उपलब्धता असल्यास बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. हरभरा
पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा + मोहरी ( २:१ ), हरभरा + करडई ( २:१) तसेच
हरभरा + ज्वारी ( ६:२ ) घेता येतात.
जवस
पेरणी
पाण्याची
उपलब्धता असल्यास १५ नोव्हेंबर पर्यंत बागायती जवस पिकाची पेरणी करून
घ्यावी.पेरणीसाठी २५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ३० X १५ सेमी
ओळीतील अंतर ठेवावे.
बटाटा
बेणेप्रक्रीया व लागवड
बटाटा
पिकाची ६० X ३०
सें. मी. अंतर ठेवुन वरंबा पध्दतीने लागवड करावी. लागवडीसाठी ३० ते ४०
ग्रॅम वजनाचे २० ते २५ क्विंटल बटाटे प्रतिहेक्टरी वापरावेत. तसेच लागवडीपुर्वी
बेणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डेझिम व रसशोषण करणार्या किडींसाठी
इमिडॅक्लोप्रिड २०० एस एल चे द्रावण करुन त्यामध्ये बेणे बुडवावेत.
त्यानंतर ५०० मिली द्रवरूप अॅझेटोबॅक्टर चे द्रावण तयार करुन बेणे १५ मिनिटे
बुडवून अशा प्रकारे बीजप्रक्रिया केल्यानंतर बेणे थंड,हवेशीर ठिकाणी पसरून
ठेवावेत. त्यानंतरच लागवडीसाठी वापरावेत.
मोसंबी
वाढीची अवस्था
मोसंबी
फळझाडांना बोर्डो मिश्रण लावून घ्यावे. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी एका
प्लास्टिकच्या बकेटमध्ये १ किलो कॉपर सल्फेट ( मोरचूद ) ५ लिटर पाण्यात मिसळून
रात्रभर भिजत ठेवावे. तसेच दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये १ किलो चुना ५ लिटर
पाण्यात मिसळून रात्रभर भिजत ठेवावे व दुसऱ्या दिवशी दोन्ही मिश्रण व्यवस्थित
एकत्रित मिसळून घेतल्यानंतर तयार झालेले बोर्डो मिश्रण १२ तासाच्या आत वापरावे.
डाळिंब
बहार व्यवस्थापन
डाळिंब
बागेचा ताण तोडताना प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो शेणखत किंवा १० ते १५ किलो
शेणखत + २ किलो गांडुळखत + २ किलो निंबोळी पेंड टाकावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
सध्य
स्थितीतील वातावरणामुळे मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी सल्फर ८० टक्के डब्ल्युपी २५ ग्रॅम किंवा मायक्लोब्युटॅनील
१० टक्के डब्ल्युपी १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
तुती रेशीम
झाडांची ७० दिवसाच्या अंतराने वर्षाकाठी ५ वेळा तुतीची छाटणी करावी. प्रत्येक ४५
दिवसाच्या अंतराने फांद्या छाटणी करावी.
पशुसंवर्धन
शेळ्यांच्या व
वासरांच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात. जेणेकरून जनावरांच्या आहारात
खनिज मिश्रणांचा पुरवठा होऊन त्यांची चांगली वाढ होते. भूक वाढते, पचन क्रिया
सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढुन दूध उत्पादनातही वाढ होते. तसेच
अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.
इतर
रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे हरभरा पिकाची ३० सेमी अंतरावर चार ओळी किंवा
४५ सेमी अंतरावर तीन ओळी याप्रमाणे पेरणी करावी, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून
राहतो.
Comments
Post a Comment