छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २३ ते २७ ऑक्टोबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून दि. २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात २२ ऑक्टोबर २०२४ रोजी
तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची
शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०-४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस)
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २० ते २६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
आद्रक
कंद धरणे अवस्था
मागील
आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के
डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
हळद
कंद धरणे अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के
डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
हरभरा
बीजप्रक्रिया व पेरणी
कोरडवाहू
हरभरा पिकाच्या पेरणीसाठी ५० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ४५ x १० किंवा ३० x १० सेमी जमीनिच्या
प्रकारानुसार ओळीतील अंतर ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ४ ग्रॅम प्रती
किलो किंवा कार्बेन्डॅझिम २ ग्रॅम आणि द्रवरूप जैवीक खत १० मिलि प्रती किलो
बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करून
पेरणी करुन घ्यावी. पिकास २५:५०:२५ याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. हरभरा पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा + मोहरी
(२:१), हरभरा + करडई (२:१) तसेच हरभरा + ज्वारी (६:२)
घेता येतात.
जवस
पेरणी
जवस
पिकाच्या पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ३० x १५ सेमी ओळीतील अंतर
ठेवावे. पिकास २५:२५:०० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा
पेरणीच्या वेळेस दयावी.
बटाटा
बेणेप्रक्रीया व लागवड
बटाटा
पिकाची ६० X ३०
सें. मी. अंतर ठेवुन वरंबा पध्दतीने लागवड करावी. लागवडीसाठी ३० ते ४०
ग्रॅम वजनाचे २० ते २५ क्विंटल बटाटे प्रतिहेक्टरी वापरावेत. तसेच लागवडीपुर्वी
बेणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डेझिम व रसशोषण करणार्या किडींसाठी
इमिडॅक्लोप्रिड २०० एस एल चे द्रावण करुन त्यामध्ये बेणे बुडवावेत.
त्यानंतर ५०० मिली द्रवरूप अॅझेटोबॅक्टर चे द्रावण तयार करुन बेणे १५ मिनिटे
बुडवून अशा प्रकारे बीजप्रक्रिया केल्यानंतर बेणे थंड,हवेशीर ठिकाणी पसरून
ठेवावेत. त्यानंतरच लागवडीसाठी वापरावेत.
मोसंबी
वाढीची अवस्था
नवीन लागवड
केलेल्या मोसंबी बागेमध्ये आंतर मशागत व तण व्यवस्थापन करावे.
डाळिंब
वाढीची अवस्था
हस्त
बहार व्यवस्थापन :- डाळिंब बागेस योग्य ताण बसला नसल्यास इथेफॉन ३९
टक्के एस एल ०९ मिली + ००:५२:३४ किंवा १२:६१:०० विद्राव्य खत ५० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन पहिली फवारणी घ्यावी. तसेच ०५ ते ०८ दिवसाच्या अंतराने इथेफॉन
३९ टक्के एस एल १० ते १५ मिली + ००:५२:३४ किंवा १२:६१:०० विद्राव्य खत ५० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन दुसरी फवारणी घ्यावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील
आठवड्यातील किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे वांगी पिकामध्ये शेंडा व फळ
पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम
रेशीम
कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती
पाने पातळ एका थरात दयावे. जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा
दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामुळे
बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.
पशुसंवर्धन
शेळ्यांच्या
व वासरांच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात. जेणेकरून जनावरांच्या
आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा होऊन त्यांची चांगली वाढ होते.भूक वाढते, पचन क्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती
वाढुन दूध उत्पादनातही वाढ होते.तसेच अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.
इतर
रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे हरभरा पिकाची ३० सेमी अंतरावर चार ओळी किंवा
४५ सेमी अंतरावर तीन ओळी याप्रमाणे पेरणी करावी, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून
राहतो.
Comments
Post a Comment