छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २६ ते ३० ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून दि. २९ व ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४२ ते ७० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात २८ व २९ ऑक्टोबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०-४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३० ऑक्टोंबर ते ०५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी ऐवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

बेणे प्रक्रिया व लागवड

पुर्वहंगामी ऊसाची लागवड करण्यापुर्वी बेणे मॅलॅथीऑन ३०० मिली + बावीस्टीन १०० ग्रॅम बुरशीनाशके १०० लीटर पाण्याच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावे रासायनिक बेने प्रक्रिया झाल्यावर त्यानंतर सिटोबॅक्टर किलो + स्फुरद विद्राव्य जिवाणू . किलो + ट्रायकोडर्मा १ किलो प्रती १०० लीटर पाण्याचे द्रावण तयार करुन बेणे प्रक्रिया करावी व नंतर लागवड करावी.

कापूस

बोंड धरणे ते वेचणी

वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी. मागील काही दिवसातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढ उतारामुळे कापुस पिकाची पाने लालसर दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डीएपी २०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम किंवा पोटॅशिअम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तूर

कळी ते फुलधारणा अवस्था

तुर पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तुर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिक कळी अवस्‍थेत असताना हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावेत व ५ टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

बीजप्रक्रिया ते पेरणी

बागायती रब्‍बी ज्‍वारी पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर बियाणे घ्यावे. तसेच पेरणीचे अंतर ४५ x १५ सेंमी ठेवावे व पेरणीपूर्वी ३०० मेस गंधक ०४  ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी त्यानंतर अझॅटोबॅक्टर + पीएसबी २५ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. ज्वारी पिकाची पेरणी वाफसा येताच करुन घ्यावी. उतार जमीनीत ज्वारी पीकाची पेरणी उतारास आडवी करावी. कोरडवाहूसाठी ४०: २०: २० याप्रमाणे नत्र स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. तर बागायतीसाठी ४०: ४०: ४० याप्रमाणे नत्र स्फुरद व पालाश खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. कोरडवाहू ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तर बागायती ज्वारीच्या पेरणी ३१ ऑक्टोंबर पर्यंत करता येते.

मका (रब्बी)

बिजप्रक्रिया व पेरणी

मका पिकाच्या पेरणीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ६० x ३० से.मी. ओळीतील अंतर ठेवुन पिकाची पेरणी करावी. पेरणी/लागवडपूर्वी सायएन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी यामुळे लष्करी अळीचे व्यवस्थापन होते व नंतर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास अ‍ॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी तसेच ट्रायकोडर्मा ५.० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे त्‍यानंतर बीयाणे सावलीमध्‍ये वाळवून पेरणी करावी.मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५  किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश दयावे.

करडई

बीजप्रक्रिया ते पेरणी

बागायती करडई पिकाची पेरणी १५ नोव्हेंबर पूर्वी करून घ्यावी.करडई पिकामध्ये करडई + जवस ( ३:३ ) हरभरा + करडई, ज्वारी + करडई ( ४:२ ) हि अंतर पिके घेता येतात.

गहू   

पूर्वमशागत

गहू पिकासाठी मध्यम ते भारी चांगली भूसभूसित जमिनीची निवड करावी. खरीप हंगामाचे पिक निघाल्यानंतर २ कुलावान्या कराव्या. शेवटच्या कुळवणी अगोदर २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकाची धसकटे व काडीकचरा वेचून रान स्वच्छ करावे. 

कांदा

रोप अवस्था

कांदा रोपवाटीकेत ऊगवून आलेल्या रोपांना झारीच्या सहाय्याने पाणी दयावे.

पेरू

फळ वाढीची अवस्था

पेरू बागेमध्ये फळकुज दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी किंवा झायनेब ७५ टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पेरु बागेतील फळमाशीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉलचे सापळे लावावेत.

सिताफळ

काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

भेंडी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन २५ ईसी ४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ३ ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

पशुसंवर्धन

पशुपालकांनी जनावरांचे रोगबाधा टाळण्याकरीता नियमित रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होवून जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.

इतर

कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी (ज्वारी, हरभरा,जवस,करडई) लवकरात लवकर पुर्ण करावी.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला