छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २० ते २४ ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून ब-याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच
कमाल तापमान २७.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश
सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२
ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दि. १९ ऑगष्ट २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडाकडाटासह जोरदार स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २४ ते
३० ऑगष्ट २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे सोयाबीन पिकामध्ये साचलेल्या
पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
खरीप ज्वारी
वाढीची अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे सोयाबीन
पिकामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी.
बाजरी
वाढीची अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे बाजरी पिकामध्ये साचलेल्या
पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
खरिप भुईमुग
फुलधारणा ते आऱ्या अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे खरिप
भुईमुग पिकामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची
दक्षता घ्यावी.
आद्रक
फुटवे अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे आद्रक पिकातील साचलेल्या पाण्याचा
निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पावसाच्या
पाण्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने झाकून टाकावेत.
हळद
फुटवे अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे हळद
पिकातील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी. तसेच पावसाच्या पाण्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने झाकून टाकावेत.
मोसंबी
फळ वाढीची ते काढणी अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे मोसंबी बागेतील साचलेल्या पाण्याचा
निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
डाळिंब
फळ वाढीची ते काढणी अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे डाळिंब
बागेतील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील आठवड्यामध्ये झालेल्या पाऊसामुळे भाजीपाला पिकातील साचलेल्या
पाण्याचा निचरा करावा व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच शेतात
पाणी वाहिल्यामुळे टोमॅटो रोपे कोलमडले असल्यास त्याच्या बुध्याजवळ माती लावून रोप
उभे करावेत.
तुती रेशीम
रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात
अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १०
ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४
किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.
पशुसंवर्धन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १९ ऑगष्ट २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी
वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह जोरदार स्वरुपाच्या
पावसाचा अंदाज असल्यामुळे पशुपालकांनी
जनावरांना पाऊस चालु असताना बाहेर चरावयास सोडू नये तसेच जनावरांना सुरक्षित
ठिकाणी बांधावे.
इतर
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात दि. १९ ऑगष्ट २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह जोरदार स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
व साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी तसेच फवारणीची कामे पुढे
ढकलावीत.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment