छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २७ ते ३१ ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला


 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते २८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७९ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ११ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २७ ते २९ ऑगष्ट २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३१ ऑगष्ट ते ०६ सप्टेंबर २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी २० मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.  

खरिप भुईमुग

दाणे भरणे ते काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या भुईमुग पीकाची काढणी करुन घ्यावी. काढणीनंतर शेंगाना ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.

आद्रक

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हळद

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच पावसामुळे हळद पिकामध्ये उघडे पडलेले कंद हलकी भर देऊन मातीने झाकुन घ्यावेत.

मोसंबी

फळ वाढीची ते काढणी अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असून व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे (मिथाईल युजेनॉल) एकरी चार ते पाच प्रमाणात लावावेत व मॅलॅथिऑन ५० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

डाळिंब

फळ वाढीची ते काढणी अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेत रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ टक्के ओडी ७.५ मिली किंवा फ्लॉनिकॅमिड ५० टक्के डब्ल्यूजी ७.५ ते १० मिली प्रति १० लिटरपाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकामध्ये पर्णगुच्छ/बोकड्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी, रोगट झाडे उपटुन नष्ट करावीत. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायमिथोएट किंवा इमिडाक्लोप्रिड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन १० ते १५ दिवसाच्या अंतराने २-३ फवारण्या स्वच्छ वातावरणात कराव्यात. 

तुती रेशीम

रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.    

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत जनावरे शेतात चरत असतांना जनावरांना जखमा होऊन त्यामध्ये अळया होतात. अशा वेळी शेतकरी बांधवांनी प्रथमोपचार म्हणून १ ते २ कापुरवडी व खोबरे तेल एकत्र मिसळून किंवा औषधी दुकानातील टर्पेन्टाईन तेलात भिजलेला कापसाचा बोळा जखमेवर सतत २ ते ३ दिवस बसविल्यास सर्व अळया मरतात. जखम जर मोठी असल्यास पशुवैद्यकाच्या सहाय्याने आयव्हरमेक्टीन इंजेक्शन द्यावे.

इतर

सद्यस्थितीत पीकावरील किड व किटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतामध्ये औषधांच्या रिकाम्या बादल्या पडून राहतात. अशा ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये जनावरे पाणी पिऊन त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फवारुन झाल्यानंतर औषधांच्या रिकाम्या बादल्यांची योग्य विल्हेवाट लावावी व जनावरांना इतरत्र कुठेही पाणी न पाजवता स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे आणि जर विषबाधा दिसून येत असल्यास पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला