छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३० ऑगष्ट ते ०३ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ११ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २९ व ३० ऑगष्ट २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ते ०९ सप्टेंबर २०२५ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. 

 कृषि हवामान सल्ला

ऊस

वाढीची अवस्था

पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी ऊस पीकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

कापूस

फांद्या लागणे ते पाते धरणे अवस्था

पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी कापूस पीकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कापूस पीकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

का

वाढीची

पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी मका पीकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

तूर

वाढीची अवस्था

पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी तूर पीकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच तूर पीकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

मूग/उडीद

परिपक्वता ते काढणी  अवस्था

पावसाची उघाड बघून काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पीकाची काढणी लवकरात लवकर करावी. तसेच काढणी केलेल्या शेंगा कोरडया व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी टाकाव्यात.

सिताफळ

फळधारणा ते फळ वाढीची अवस्था

पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी सिताफळ बागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व बागेमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी भाजीपाला पीकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच भाजीपाला पीकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

पशुसंवर्धन

पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहता शेतकरी बांधवांनी आपले पशुधन झाडाखाली, पाणवठयाजवळ किंवा लोखंडी अवजारांना न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत. तसेच जोरदार पावसाच्या अनुषंगाने गोठयांची डागडूजी करुन घ्यावी. पाऊस चालू असतांना जनावरांना बाहेर चरावयास सोडू नये.

इतर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २९  व ३० ऑगष्ट २०२५ रोजी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवानी पीकांमधील व फळबागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात तसेच बागेमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पीकांमधील फवारणीची कामे पुढे ढकलावीत व जोरदार पाऊस चालू असतांना शेतात जाणे टाळावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला