छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १० ते
१६ ऑगष्ट २०२५ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल
तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५
मिलि किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी
५-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
खरीप ज्वारी
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव
होण्याची शक्यता असुन, प्रादुर्भाव ओळखण्यासाठी पिकात १५ कामगंध सापळे प्रति एकर
याप्रमाणे लावावेत. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५
टक्के किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
बाजरी
वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे बाजरी
पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
खरिप भुईमुग
फुलधारणा ते आऱ्या अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
व दमट वातावरणामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच भुईमुग पिकामध्ये टिक्का
रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल ५ टक्के
ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
आद्रक
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
व दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा (कंदसड) प्रादुर्भाव टाळण्यासाठी
परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची
५ लिटर प्रति एकर प्रमाण २०० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे हळद पिकावर पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सध्यस्थितीत हळद पीक पिवळे पडत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेट किंवा एडिटिए चीलेटेड मिक्स
मायक्रोनुट्रीएंट ग्रेड (II) ५० ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवड्यातील मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य
रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅनो युरिया
४० मिली व कार्बेन्डाझिम १२ टक्के + मॅंकोझेब ६३ टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड
(GA) २
ग्रॅम + पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर
पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली किंवा
थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी. तसेच डाळिंब बागेमध्ये
तेलकट डागांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून याच्या व्यवस्थापनासाठी
स्ट्रेप्टोसायक्लिन ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा मॅन्कोझेब या
बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच भाजीपाला पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे
व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत.
तुती रेशीम
रेशीम
किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय
देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व
कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.
पशुसंवर्धन
शेतकरी बांधवानी
सद्यस्थितीत जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या चाऱ्याचा समावेश करावा, जेणेकरून जनावरांच्या आहारातील तंतुमय
पदार्थाचे प्रमाण वाढेल व पोटदुखी, हगवण
यासारखे रोग उद्भवणार नाहीत.
इतर
सर्व शेतकरी
बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत
व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते
(बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे
विक्रीकरीता उपलब्ध आहेत.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment