छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १७ ते २१ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ
राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते २८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान
२२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के राहील
तर वाऱ्याचा वेग ०८ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता
: छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी
तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह
जोरदार तर दि. १७ ते १९ सप्टेंबर २०२५ रोजी
हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास)
राहील.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २१ ते २७ सप्टेंबर २०२५ दरम्यान
हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान व किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
शेंगा धरणे ते दाणे भरणे अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी सोयाबीन
पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी.
बाजरी
दाणे भरणे अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी बाजरी पीकांमधील
साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
आद्रक
फुटवे ते कंद धरणे अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आद्रक पीकांमधील
साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
हळद
फुटवे ते कंद धरणे अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी हळद पीकांमधील
साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
मोसंबी
फळ वाढीची ते काढणी अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी मोसंबी
फळबागेमधील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी.
डाळिंब
काढणी अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी डाळींब
फळबागेमधील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी भाजीपाला
पीकांमधील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी. तसेच पावसामुळे खाली पडलेल्या टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला पीकांना दोरी
व काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.
तुती रेशीम
रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात
दयावे.जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे.रेशीम कीटक कात
अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामळे बेडवरील आर्द्रता कमी
होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते वेळी अर्धा तास अगोदर विजेता
निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति किल्लो मिसळून रॅकवर
धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ घालण्या अगोदर अर्धा ते एक तास
पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना खादय दयावे.
पशुसंवर्धन
शेतकरी बांधवांनी जनावरांना पाऊस चालू असतांना बाहेर चरावयास नेणे टाळावे तसेच पाणी पाजविण्यास जनावरांना नदी, तलाव तसेच सार्वजनिक पानवठयाजवळ न जाता
गोठयाजवळच शुध्द व ताज्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे पशुधनास पाऊस काळात सुरक्षित
ठिकाणी बांधावे.
इतर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी
तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह
जोरदार तर दि. १७ ते १९ सप्टेंबर २०२५ रोजी
हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी
पीकांमध्ये व फळबागेतील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पीकात पाणी साचणार नाही
याची दक्षता घ्यावी तसेच पाऊस चालू असतांना शेतात जाणे टाळावे व पशुधनाची काळजी घ्यावी.
शेतकरी बांधवांनी
शेतामध्ये किड व किटकनाशके फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बादल्या, डब्बे, पाकीटे
इत्यादीं तलाव, नद्या तसेच सार्वजनिक पाणवठयामध्ये न धूता त्यांची व्यवस्थितपणे
विल्हेवाट लावावी. जेणेकरुन या औषधांपासून जनावरांना होणारी विषबाधा रोखता येईल.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment